सर्वांसाठी अन्न-इयत्ता पाचवी प.अभ्यास-१

3594

सर्वांसाठी अन्न-इयत्ता पाचवी-

सर्वांसाठी अन्न-भारताचा सुमारे 60 टक्के भाग शेतीसाठी वापरात आहे. जून ते ऑक्टोबर पर्यंत च्या हंगामास खरीप हंगाम म्हणतात.क्‍टोबर ते मार्च पर्यंतच्या हंगामास रब्बी हंगाम म्हणतात.
भरगोस शेती उत्पादनासाठी उत्तम जमीन उत्तम बियाणे व खते तसेच पाण्याची उपलब्धता असावी लागते.

सांगा पाहू पा.पु. पृ.क्र.-५८

१) दिवाळीच्या सुमारास कोणत्या भाज्या येतात ? कोणती फळे येतात ? कोणते धान्य येते ?
उत्तर- दिवाळीच्या सुमारास सुरण चवळीच्या शेंगा फुलकोबी वांगे टमाटे इत्यादी भाज्या येतात.व शिंगाडे सिताफळ आवळे केळी इत्यादी फळे येतात. धान्यामध्ये दिवाळीमध्ये तूर मूग उडीद ज्वारी तांदूळ इत्यादी.
२) ज्वारी बाजरी तांदूळ आंबा संत्री फणस यांचा हंगाम केव्हा असतो ?
उत्तर- ज्वारी व बाजरी यांचा हंगाम खरीप व रब्बी दोन्ही आहे. तांदूळ नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये येतो. म्हणजेच याचा रब्बी हंगाम आहे. आंबा उन्हाळ्यामध्ये तो म्हणजे आंबा उन्हाळी पीक आहे.फणस हेही उन्हाळी आहे. पण आजकाल ती हिवाळ्यात पण बाजारात दिसतात.संत्री ही पीक हिवाळ्यामध्ये दिसते. तसेच आंबिया बार म्हणून हे पीक उन्हाळ्यात पण होते.
३) आपण वनस्पतीच्या कोण कोणत्या अवयवाचा अन्नासाठी वापर करतो ?
उत्तर- आपण वनस्पतीच्या खोड मुळे पाने फुले या अवयवांचा अन्नासाठी वापर करतो.
४) भात शेती कोणत्या हंगामात करतात ?
उत्तर- भात शेती म्हणजे धान हे खरीप हंगामात पेरतात व त्याचे पीक तांदूळ हे रब्बी हंगामात येते.
सर्वांसाठी अन्न-इयत्ता पाचवी-
आपले घर व पर्यावरण-पाचवी-प.अभ्यास-१
या प्रकरणावरील व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

शेती

शेतीचे हंगाम: वनस्पती पासून आपल्याला अन्न मिळते. त्यासाठी शेतांमध्ये पिकाची पेरणी व बागांमध्ये फळझाडांची लागवड केली जाते.भारताचा सुमारे 60 टक्के भूभाग शेतीसाठी वापरात आहे.ऋतुमानाप्रमाणे वर्षभरात शेतीचे दोन प्रमुख हंगाम असतात.
जून ते ऑक्टोबर पर्यंत च्या हंगामास खरीप हंगाम म्हणतात.या हंगामात पावसाच्या पाण्याचा प्रत्यक्ष वापर होतो.
क्‍टोबर ते मार्च पर्यंतच्या हंगामाला रब्बी हंगाम म्हणतात.
या हंगामात जमिनीत मुरलेले पावसाचे पाणी परतीचा मान्सून आणि पडणारे दव यांचा उपयोग होतो.याशिवाय मार्च ते जून मध्ये जी पिके घेतली जातात त्यांना उन्हाळी पिके म्हणतात.
शेतीची कामे: आपल्या शेतातील पीक चांगले वाढावे असे प्रत्येक शेतकऱ्याला वाटते. पीक चांगले वाढले तर त्यापासून त्याला उत्पन्नही अधिक मिळते.
भरगोस शेती उत्पादनासाठी उत्तम जमीन उत्तम बियाणे व खते तसेच पाण्याची उपलब्धता असावी लागते.
मशागतीची कामे करणे आवश्यक असतेत्याबरोबर शेतातील पिकांचे संरक्षण करावे लागते आणि शेवटी हाती आलेल्या धान्याची सुरक्षित साठवण करावी लागते. या सर्वच प्रक्रिया महत्त्वाच्या असतात.आपल्या देशाची लोकसंख्या वाढत असली तरी सर्वाच्या अन्नाची गरज भागवली जात आहे.शेतीच्या सुधारित पद्धतीचा वापर केल्यामुळे हे शक्य झाले आहे.