स्वाध्याय-स्वच्छतेचा प्रकाश-इयत्ता पाचवी-मराठी

3862

स्वाध्याय-स्वच्छतेचा प्रकाश

स्वाध्याय-स्वच्छतेचा प्रकाश -लेखक व पाठ परिचय- या पाठात यदुनाथ थत्ते व डॉक्टर अनिल गोडबोले या दोन लेखकांचे लेख आहेत. पाठाच्या पहिल्या भागात यदुनाथ थत्ते यांनी एका शाळेतील प्रसंग सांगितला आहे.

स्वाध्याय-स्वच्छतेचा प्रकाश

प्रश्न-१ थोडक्यात उत्तरे लिहा.

अ) सेनापती बापट यांनी गावकऱ्यांना स्वच्छता मोहिमेत सामील व्हायला का सांगितले ?
उत्तर– आपल्या देशाची स्वच्छता ही आपल्या वैयक्तिक स्वच्छतेवर एच महत्त्वाची असते.त्याची सुरुवात आपण गाव-शहर स्वच्छ ठेवून करायला हवी.म्हणून सेनापती बापट यांनी गावकऱ्यांना स्वच्छता मोहिमेत सामील व्हायला सांगितले.
आ) गावकऱ्यांनी तात्यांच्या वडिलांना काय सांगितले?
उत्तर– गावकऱ्यांनी तात्यांच्या वडिलांची म्हणजे दादांची भेट घेतली.तात्या करत असलेल्या स्वच्छता मोहिमेची माहिती दिली. वडिलांनी मुलाला समजावून सांगावे असे गावकऱ्यांनी सुचवले.
इ) तात्यांच्या कोणत्या कृतीमुळे लोकांच्या वृत्तीत बदल होत गेला ?
उत्तर- गावातील लोकांना गावाची सफाई करण्यात कमीपणा वाटत होता. सेनापती बापट सफाई करतात तेव्हा ते गावकऱ्यांना चांगले वाटत नव्हते तसे त्यांनी बापटांना बोलून देखील दाखवले. पण सेनापती बापट यांनी सफाई शहरात अबोलपणे आयुष्यभर राबवले व लोकांच्या वृत्तीत बदल घडून आला.
ई ) थोर व्यक्ती आपल्याला कशा प्रकारे शिकवण घालून देतात?
उत्तर- थोर व्यक्ती आपल्याला शिकवण देताना ते फक्त लोकांना उपदेश करीत नाहीत. तर आपल्या कृतीतून ते उपदेश प्रत्यक्षात आणत असतात. कोणी कितीही विरोध केला तरी ते आपले व्रत आयुष्यभर राहतात व आपल्याला कृतीतून समाजाला शिकवण देत राहतात.
स्वच्छतेचा प्रकाश-इयत्ता पाचवी-मराठी
स्वध्यावरील व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

प्रश्न-२ तुमच्या शब्दात उत्तरे लिहा.

अ) तुम्ही शाळेत स्वच्छता मोहीम केव्हा राबवता ?
उत्तर- शाळेत प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, स्नेहसंमेलन, तसेच महिन्यातून दोनदा शाळेत स्वच्छता मोहीम राबवतात.
आ) जेव्हा तुम्ही शाळेत स्वच्छता मोहीम राबवता तेव्हा कशाकशाची सफाई करता? का?
उत्तर- शाळेत स्वच्छता मोहीम राबवण्यात येते तेव्हा शाळेतील वर्ग खोल्या, व्हरांडा, पटांगण यांची सफाई करण्यात येते.
त्यामुळे शाळा स्वच्छ व नीटनेटके दिसते. स्वच्छतेमुळे वातावरणात प्रसन्नता पसरते व उत्साह निर्माण होतो.
इ) तुमच्या मित्राला स्वच्छता करायला आवडत नाही. तुम्ही त्याला स्वच्छतेचे महत्व कसे पटवून द्यावे? ते आठ दहा ओळीत लिहा ?
उत्तर- आपण नेहमी सुंदर व चांगले दिसण्यासाठी प्रयत्न करीत असतो. त्यासाठी आपण दररोज अंघोळ करतो व स्वच्छ टापटीप कपडेदेखील घालतो.
त्यामुळे आपल्याला प्रसन्न वाटते व उत्साह जाणवतो.स्वतः प्रमाणेच आपण आपले घर देखील स्वच्छ ठेवतो.जशी आपण स्वतःच्या व घराच्या स्वच्छतेची काळजी घेतो,तसेच परिसराची काळजी घेणे हे देखील आपले कर्तव्य आहे. आजूबाजूच्या अस्वच्छतेचा परिणाम हा शेवटी आपल्यावरच होणार आहे. स्वच्छता हा समृद्धीकडे जाण्याचा पायाभूत मार्ग आहे. त्यामुळे आपला परिसर गाव शहर देश स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. व त्यासाठी ती स्वतःला तशी शिस्त व सवय लावणे गरजेचे आहे.