माय मराठी -इयत्ता पाचवी-Class 5th-Marathi

8024

माय मराठी -इयत्ता पाचवी

कवी व कविता परिचय

या कवितेच्या कवयित्री संजीवनी मराठे असून कवितेत मराठी भाषेची थोरवी वर्णन केली आहे.हे माय मराठी! मी तुझ्या पायाशी तन-मन-धन वाहिले असून तुझ्या नावात व तुझ्या वास्तव्यात मी अखंड रंगत आहे .मला मराठी भाषेविषयी अभिमान आहे.

माय मराठी-इयत्ता पाचवी मराठी

ऐका व म्हणा.

माय मराठी! तुझिया पायी तनमनधन मी वाहियले,
तुझिया नामी, तुझिया धामी अखंड रंगुनि राहियले.
कष्टामधली तुझौच गोडी चाखायाची मज आई,
मला आवडे तुझा विस्रावा, तुझीच निर्भर अंगाई.
तुझे झरे अन्‌ तुझी पाखरे, वास तुझा जनलोक तुझा,
हवाहवासा मला वाटतो राग तुझा, संतोष तुझा.
——- तुझिया अंकी लोळण घेते, बागडते,
तसेच अलगत तव आभाळी भरारणे मज आवडते.
तुझे चालणे, तुझे बोलणे, दाखव मजला रीत तुझी,
जे ओठी ते पोटी असली शिकवी मजला प्रीत तुझी.
तुझियासाठी गुंफित बसते मोहनमाला शब्दांची,
अर्थ साजरा, गंध लाजरा, नवलपरी पण रंगांची.
——- तुझियासाठी वात होउनी जळते मी,
क्षणाक्षणाने कणाकणाने तुझया स्वरूपा मिळते मी.
 
जय जय महाराष्ट्र माझा- इयत्ता सातवी मराठी
या कवितेवरील व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

कवितेचा अर्थ

इयत्ता पाचवी हे माय ———! मी तुझ्या पायाशी तन-मन-धन वाहिले असून तुझ्या नावात व तुझ्या वास्तव्यात मी अखंड रंगत आहे .मला मराठी भाषेविषयी अभिमान आहे
हे आई मला तुझ्या करिता कष्ट करायला आवडते. तुझ्या सहवासात राहायला आवडते.आणि मला तुझी अंगाई देखील आवडते.
तुझ्या प्रदेशातील पाखरे आणि येथील लोक मला हवेहवेसे .माय मराठी भाषेत व्यक्त केलेला राग,आनंद या भावना मला हव्याहव्याशा वाटतात.
हे मराठीमाय !मला तुझ्या मुलखातच खेळायला बागडायला आवडते.तसेच माझ्या मनातील कल्पना सहजतेनं मराठीतच व्यक्त करायला आवडतात.
तुझ्या बरोबर चालणे,माय मराठीत बोलणे ,मराठी संस्कृती याबद्दल मला नितांत प्रेम आहे.जे मनात असेल ते बोलून दाखविणे, ही तुझी शिकवण मला आणखी निर्णय करते.
माय मराठीतील शब्द,त्यांचा अर्थ व त्यातील भावभावनांची सुंदरता, यांची सुंदर मोहन माळ गुंफण्यात मी मग्न झाले आहे.
 मी नेहमी तुझ्यासाठी झटत राहील.जगात तुझी पताका फडकविण्यासाठी सतत कार्यरत राहील. व मी मराठीचा सतत अभिमान बाळगेन.असे कवी म्हणतो.
वरील कवितेची टेस्ट येथे क्लिक करून सोडवा
स्वाध्याय-माय मराठी-इयत्ता पाचवी