स्वाध्याय-सर्वांसाठी अन्न-इयत्ता पाचवी -प.अभ्यास-१

3703

स्वाध्याय-सर्वांसाठी अन्न-इयत्ता पाचवी

स्वाध्याय-सर्वांसाठी अन्न-भारताचा सुमारे 60 टक्के भाग शेतीसाठी वापरात आहे. जून ते ऑक्टोबर पर्यंत च्या हंगामास खरीप हंगाम म्हणतात. क्‍टोबर ते मार्च पर्यंतच्या हंगामास रब्बी हंगाम म्हणतात.

स्वाध्याय-सर्वांसाठी अन्न-इयत्ता पाचवी

 काय करावे बरे ?

१) कुंडीतील रोप वाढत नाही.
उत्तर- कुंडी ला सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ठेवावी. कुंडीतील माती वर खाली करावी जेणेकरून मुलास पुरेसा ऑक्सिजन मिळेल. आवश्यक तेवढेच पाणी घालावे.
२) जरा डोके चालवा
घरामध्ये अन्नधान्याचा साठा कशासाठी केलेला असतो ?
उत्तर- घरामध्ये अन्नधान्याचा साठा करून ठेवण्याची कारणे खालील प्रमाणे आहेत.
१) एखाद्या वर्षी पूर अवर्षण वादळे गारपीट अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे पीक कमी प्रमाणात होते. म्हणून त्याची पूर्व सोय म्हणून अन्नाचा साठा करतात. २) पिकाचे प्रमाण कमी झाले की मालाचा बाजार भाव पण वाढतो. ३) काही वेळा व्यापारी वर्ग देखील त्याच्या गोदामात साठवून पिकांच्या कमतरतेची घोषणा करतात व ते अत्यंत जास्त भावात विकत. ४) म्हणून अन्न संशय केल्यामुळे आपणास आवश्यक त्या वेळी अन्नधान्य उपलब्ध होऊ शकते.
सर्वांसाठी अन्न-२-इयत्ता पाचवी-प.अभ्यास-१
स्वाध्यायावरील व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
३) चूक की बरोबर ते सांगा चुकीचे विधान दुरुस्त करून लिहा.
१) शेती करण्याची फक्त एकच पद्धत आहे.- चूक
बरोबर विधान- पारंपारिक शेती जसे सेंद्रिय शेती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करणे. असे प्रकार आहेत.
२) आपला भारत देश हा शेती प्रधान आहे.- बरोबर
३) सुधारित बियाणांच्या वापरामुळे उत्पादन वाढत नाही.- चूक
बरोबर विधान- सुधारित बियाणांच्या वापरामुळे पिकांची वाढ झपाट्याने होते, कमी पाण्यातही भरघोस पीक देतात.
४) गरजेपेक्षा जादा संचय करणे याला साठा करणे असे म्हणतात- बरोबर
४) खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
अ) सुधारित बियाणांच्या वापरामुळे कोणकोणते फायदे होतात ?
उत्तर- सुधारित बियाणे अधिक पीक घेतात. किडीला बळी पडत नाही. तसेच काही बियाणांपासून पिकांची वाढ झपाट्याने होते. काही बियाणी कमी पाण्यातही भरघोस पीक देतात. अशाप्रकारे सुधारित बियाणांची च्या वापरामुळे फायदे होतात.
आ) सिंचनाच्या सुधारित पद्धती कोणत्या ? त्याचे फायदे कोणते?
उत्तर- ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन या सिंचनाच्या सुधारित पद्धती आहेत.
फायदे- ठिबक सिंचन पद्धतीमध्ये छिद्रे असलेल्या नलिका वापरतात. म्हणून पिकांच्या मुळाशी आवश्यक तेवढेच पाणी ठिबक खते. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा पुरेपूर वापर होतो व पाणी वाया जात नाही.
तसेच तुषार सिंचन पद्धतीमध्ये लहान-मोठ्या कारंज्या मधून पिकांवर तुषार याप्रमाणे पाणी फवारले जाते. म्हणून पाण्याचा एकदम न मिळता आवश्यक तेवढेच पाणी पिकांना प्राप्त होऊन त्याच्या मुळाशी ते पाणी चांगले मुरते.
इ) ठिबक सिंचन पद्धतीचे वर्णन करा.
उत्तर- ठिबक सिंचन पद्धतीमध्ये छिद्रे असलेल्या नलिकांच्या वापर करण्यात होतो. त्यामुळे पिकांच्या मुळाशी आवश्यक तेवढेच पाणी ठिबक ते व ते मुलांपाशी मुरते. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा पुरेपूर वापर होतो.
ई) कोणकोणत्या कारणांमुळे वाढत्या पिकाचे नुकसान होते?
उत्तर- खाली दिलेल्या कारणांमुळे वाढत्या पिकाचे नुकसान होते.
१) किडीमुळे किंवा रोग पडून वाढत्या पिकाचे नुकसान होते. २) योग्य वेळी पुरेसे पाणी मिळाले नाही किंवा अतिरिक्त पाण्याचा वापर यामुळे पिकाचे नुकसान होते.
३) कीटकनाशक फवारणी चा अतिप्रमाणात वापर. ४) रासायनिक खतांचा बेसुमार वापर या सर्व कारणांनी वाढत्या पिकांचे नुकसान होते.