सर्वांसाठी अन्न-२-इयत्ता पाचवी-प.अभ्यास-१

3566

सर्वांसाठी अन्न-२-इयत्ता पाचवी

सर्वांसाठी अन्न-२-भारताचा सुमारे 60 टक्के भाग शेतीसाठी वापरात आहे. जून ते ऑक्टोबर पर्यंत च्या हंगामास खरीप हंगाम म्हणतात. क्‍टोबर ते मार्च पर्यंतच्या हंगामास रब्बी हंगाम म्हणतात.
भरगोस शेती उत्पादनासाठी उत्तम जमीन उत्तम बियाणे व खते तसेच पाण्याची उपलब्धता असावी लागते.

सिंचनाच्या आधुनिक पद्धती:

योग्य वेळी पुरेसे पाणी मिळाले तर पिकांची वाढ चांगली होते. पावसाबरोबरच नदी तलाव विहिरी यातील पाण्याचा उपयोग शेतीसाठी केला जातो.
नद्यांवर धरणे बांधून तसेच पावसाचे पाणी अडवून पाणी साठा केला जातो.असे केल्याने भूजल पातळीही वाढते.
पिकाला पाटाने पाणी देण्याची पूर्वापार पद्धत आहे.परंतु या पाठातून वाहणाऱ्या पाण्यात पैकी बरेच पाणी जमिनीत जिरते किंवा त्याचे बाष्पीभवन होते. त्यामुळे खूप पाणी वाया जाते. आता सिंचनाच्या आधुनिक पद्धतीचा वापर केला जात आहे. यामुळे पाण्याची बचत होते.
ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन या सिंचनाच्या आधुनिक पद्धती आहेत. ठिबक सिंचन पद्धतीमध्ये छिद्रे असलेल्या नलिका वापरतात.
त्यामुळे पिकांच्या मुळापाशी आवश्यक तेवढेच पाणी ठिबकते. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा पुरेपूर वापर होतो.तुषार सिंचन पद्धतीमध्ये लहान-मोठ्या कारंजा मधून पिकांवर पाणी फवारले जाते.

सर्वांसाठी अन्न-२-इयत्ता पाचवी

सर्वांसाठी अन्न-इयत्ता पाचवी प.अभ्यास-१
या घटकावरील व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

खते:

जमिनीमध्ये तीस तीस पिके घेतली गेल्यास जमिनीची सुपीकता कमी होत जाते. म्हणून आपल्याला मातीत खते मिसळून मातीची सुपीकता वाढवावी लागते.
त्यामुळे पिकांना योग्य त्या पोषक द्रव्यांचा पुरवठा होतो. नैसर्गिक खते आणि रासायनिक खते अशी दोन प्रकारची खते असतात.
नैसर्गिक खते ही निसर्गात उपलब्ध असलेल्या पालापाचोळा बसेन अशा पदार्थाचा वापर करून मिळतात.रासायनिक खते म्हणजे कृत्रिम खते. या खतांमध्ये शेतीला उपयुक्त अशा विविध रासायनिक घटकांचे नेमके प्रमाणात केलेले मिश्रण असते.पूर्वापार शेती पद्धतीत शेणखत लेंडीखत हिरवळीचे खत कंपोस्ट खत अशा नैसर्गिक खतांचा वापर केला जाईल. परंतु उत्पादन श्री ग्रह अधिक वाढ होण्यासाठी वापरलेल्या रासायनिक खतांच्या वापराचे तोटे ही लक्षात येऊ लागले.
रासायनिक खतांचा बेसुमार वापर झाल्यामुळे अतिरिक्त खते जमिनीत शिल्लक राहतात. त्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होते अशा जमिनीत धान्य उत्पादन घटते.

पिकांचे संरक्षण:

किडीमुळे किंवा रोग पडून पिकांचे नुकसान होते यावर उपाय म्हणून कीड आणि रोग जंतू मारणारी कीटकनाशके पिकांवर फवारली जातात किंवा बियाणे पेरणी आधी त्यावर औषधे चोळतात.
धान्याची साठवण: शेतीतील उत्पादन वाढविण्यात बरोबरच शेतातून मिळालेले धान्य नीट साठवणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे.
धान्य साठवण्यासाठी कोणत्या पद्धती वापरतात ?
शेतकरी हाती आलेले धान्य उन्हात चांगले वाळवून पोत्यात भरतात. ही पोती घरात किंवा विक्रीनंतर गोदामांमध्ये किंवा दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात साठवली जातात.साठवलेला धान्याची नासाडी दोन प्रकाराने होते. किडे मुंगी उंदीर घुशी यांच्यामुळे धान्याची खूप नासाडी होते. तसेच दमट व थंड जागी धान्य साठवल्यास धान्याला बुरशी लागून ते खाण्यालायक राहत नाही.
कीड मुंगीसा उपद्रव होऊ नये म्हणून धान्य साठवण्याच्या जागी योग्य ती औषधे फवारतात किंवा धान्य साठा होती पसरतात.
धान्य साठ्यात कडूनिंबाची पालाही घालतात. धान्य साठ्यात ठेवण्यासाठी काही संरक्षण औषधे ही बाजारात मिळतात. त्यांच्या वासाने धान्याला कीड लागत नाही.
धान्याला बुरशी लागू नये म्हणून धान्य साठवण्याची जागा नेहमी कोरडी ठेवतात. तसेच तेथे हवा खेळती राहील याची काळजी घेतात.