शिष्यवृत्ती परीक्षा इ.4 थी -2027 | Shishyvrutti Exa.-संवाद -2

                                                
संवाद-2

"अगं, कसला विचार करतेस?"

"अरे दादा, बाईंनी निबंध लिहायला सांगितलाय. कसा लिहू?"

"कोणते विषय दिले आहेत?"

"माझा आवडता सण, पावसाळा, सूर्य उगवलाच नाही तर ... "

"तुला कोणता विषय आवडलाय? त्याबद्दलची माहिती लिहून काढ."

"'पावसाळा' हा विषय मला आवडलाय. मला निबंध लिहायला मदत करशील ना?"

"तू प्रथम मुद्दे लिहून काढ. मी वाचून तुला सांगेन."

"चालेल, बाईंनी सांगितल्याप्रमाणे मी मुद्दे, कवितेच्या ओळी पहिल्यांदा लिहून काढते."

"मग तर अतिशय छान निबंध लिहिशील तू."

"माधव, तिला स्वतःलाच लिहू दे रे निबंध." आईने स्वयंपाकघरातूनच सूचना दिली.


Post a Comment

0 Comments