
संवाद-1
"श्रुती, अगं बाबा कोठे आहेत, पाहतेस का जरा?"
"आई, विभाला सांग मी अभ्यास करतेय."
"थांब हं, बाबा आल्यावर तू काम ऐकत नसल्याचे सांगते."
"आले गं आई, पण मला एका प्रश्नाचे उत्तर सांगशील का?"
"विचार लवकर प्रश्न."
"आई पाऊस का गं पडतो?"
"श्रुती, पृथ्वी थंड राहावी, प्राणिमात्रांना, वनस्पतींना पाणी मिळावं म्हणून."
"मग समुद्रावर पाऊस का गं पडतो?"
"मी सांगू का गं ताई?" विभा ओरडून म्हणाली.
"श्रुती, अगं किती प्रश्न विचारशील? बाबांना बोलावून आण पाहू."
"आणते, आम्हांला शाळेत सोडायलाही त्यांना यायचं आहेच."
"आलो आलो मी. बागेत झाडांना पाणी घालत होतो."
आजोबा हे सर्व फक्त ऐकत होते.

0 Comments