शिष्यवृत्ती परीक्षा इ.4 थी -2027 परीक्षा-कविता -5

 

कविता-5

देवा नारायणा तुमच्या मोजू का मी चुका?

मी लहान म्हणून तुम्ही चिडू मात्र नका

प्राजक्ताची नाजूक फुले टिकाऊ का नाहीत?

रंगीत फुलात वास घालणे विसरलात का घाईत?

हापूस आंब्यात विनाकारण केवढी मोठी कोय?

आणि एका पपईत हजार बिया होय?

जरदाळूतल्या बदामांवर कशासाठी साल?

अक्रोडाचे कवच म्हणजे फुक्कट आमचे हाल!

आता निदान पुढच्या वेळी नीट करा सगळे

कावळे थोडे गोरे करा रंगीत करा बगळे.

Post a Comment

0 Comments