कविता-4
राजा राजा म्हणसी मजला आणि सांगसी काम कसे?
गोष्टीमधला राजा बसतो, सिंहासन मज नाही तसे?
राजा राजा म्हणसी मजला, प्रधानजी का नाही कुणी?
घोडा नाही, सैन्यही नाही, कसा नाही ग शत्रू कुणी?
म्हणू नको तू राजा मजला, खोटे बोलू नको उगा
नाही का तुज इतुके ठाऊक, तू आई मी बाळ तुझा.


0 Comments