भूमितीतील मुलभूत संबोध-सहावी गणित

4584

चला चर्चा करुया

भूमितीतील मुलभूत संबोध -खालील चित्राचे निरीक्षण करा या चित्रामध्ये प्रेमाने जोडलेली रांगोळी आहे रांगोळी पूर्ण करा रांगोळी पूर्ण करून झाल्यावर खालील प्रश्नांच्या मदतीने वर्गात चर्चा करा.

भूमितीतील मुलभूत संबोध-सहावी गणित

१) रांगोळी काढण्यासाठी पृष्ठभाग कसा हवा ?
उत्तर-सपाट .
२) रांगोळी काढताना सुरुवात कशी केली ?
उत्तर-टीपके काढून.
३) रांगोळी पूर्ण करण्यासाठी काय काय केले ?
उत्तर-ठिपके जोडणारे रेषाखंड काढले.
४) रांगोळी तुम्हाला कोणकोणते आकार दिसतात ?
उत्तर-चौकोन,त्रिकोण ,आयत.
५) स्कूटरवर किंवा हत्तीच्या पाठीवर रांगोळी काढता येईल का ?
उत्तर– नाही.
६) कागदावर रांगोळी काढताना कशाने काढतात ?
उत्तर-पेन,पेन्सिल.

बिंदू

भूमितीतील मूलभूत संबोध-बिंदु लहान शेठ टक्क्याने दर्शवला जातो. पेन किंवा टोकदार पेन्सिलने कागदावर लहानसा ठिपका काढता येतो. रांगोळीचे ठिपके ही बिंदूची प्रतीके आहेत.
बिंदूला नाव देता येते .बिंदूचे नाव लिहिताना अक्षराचा वापर करतात.रेषाखंड व रेषा कागदावर A व Bअसे दोन बिंदू घ्या व ते पतीच्या मदतीने जोडा.
आपल्याला AB ही सरळ मिळते, हि रेघ B च्या बाजूने पुढे वाढवता येईल का? Aच्या बाजूने वाढवता येईल का ?किती वाढवता येईल ?
या घटकावरील ऑनलाईन चाचणी सोडवा.
संख्याज्ञान-सहा अंकी संख्याची ओळख-पाचवी गणित
हि रेघ जेवढा कागद आहे तेवढी दोन्ही दिशांना वाढवता येईल,कागद खूप मोठा असेल तर ती खूप मोठी काढता येईल मैदानावर इथे मोठी रेघ काढता येईल.आपण अशी कल्पना करू,की ही रेघ दोन्ही बाजूंना अमर्याद वाढवता येईल.अशा आकृतीला रेषा म्हणतात,अशी रेषा कागदावर दाखवताना दोन्ही बाजूंना मर्यादा आहे.हे बाणांनी दाखवतात.गणितात रेषा म्हणजे सरळ रेषा. आपण काढलेली पहिली रेघ A पासून B पर्यंतच होती. ति रेघ या नव्या रेषेच्या तुकडा म्हणजे रेषाखंड.
आहे, खंड म्हणजे तुकडा, रेषा खंडाला त्याच्या मर्यादा दाखवणारे दोन बिंदू असतात.त्यांना अंतिम बिंदू म्हणतात.रेषाखंड AB हा थोडक्यात रेख AB असा लिहितात.Aव B हे त्यांचे अंतिम बिंदू आहेत, रेषा एका लहान इंग्रजी अक्षराने किंवा रेषेवरील कोणत्याही दोन बिंदू च्या साह्याने दाखवली जाते, इथे रेषां/ दाखवली आहे. तिचे नाव रेषा PQ किंवा रेषा QP असे देखील लिहिता येते.
बलसागर भारत होवो-इयत्ता सहावी मराठी

किरण

भूमितीतील मुलभूत संबोध-सहावी गणित

 वरील चित्रे पहा काय दिसते? सूर्यापासून निघणारे किरण सर्व दिशांना पुढे पुढे जात राहतात विजेरी चे प्रकाश किरण एका ठिकाणाहून निघून एकाच दिशेने पुढे पुढे जात राहतात.
किरण हा रेषेचा भाग आहे. एका बिंदूपासून सुरुवात होऊन तो एकाच दिशेने पुढे पुढे जात राहतो. किरणाच्या सुरुवातीच्या बिंदूला आरंभ बिंदू म्हणतात. येथे Pहा आरंभ बिंदू आहे Q च्या दिशेने किरण अमर्याद आहे. हे दाखवण्यासाठी बाण काढला आहे, शेजारील आकृती चे वाचन किरण PQ असे करतात.

प्रतल

खालील चित्रातील तिनही आकृत्यांचे पृष्ठभाग कसे आहेत? पहिल्या दोन चित्रातील पृष्ठभाग, सपाट आहेत. हा सपाट पृष्ठभाग एका अमर्याद पृष्ठाचा भाग आहे. सपाट पृष्ठभागला गणिती भाषेत प्रतल म्हणतात.
पुस्तकातील आकृतीत मुलाचे नाव H आहे प्रतल आची आकृती अमर्याद काढलेली असली तरी प्रतल चहूबाजूंना अमर्याद असते,
प्रतल सर्व दिशांना अमर्याद आहे. हे बाणाने दाखवले जाते परंतु अनेकदा सोयीसाठी हे बार काढले जात नाहीत.

समांतर रेषा

पुस्तकातील पान नंबर तीन वरील चित्रातील वही चे पान पहा वहीचे पान हा प्रकला चा भाग आहे का वहीच्या पानावरील आडव्या रेषा वाढवल्या तर एकमेकींना मिळतात का.