मधून मधून पक्षी दिसतात. कोणी शेतावर तर कोणी नदीवर. कोणी झाडावर तर कोणी डोंगरावर. काळ्यारंगाचा, सडपातळ असा कोतवाल उडतो, तेव्हा त्याची झेप काय सुंदर दिसते! जणू काही विमानच. शेपटी लांब,चोच काळी अन् डोळ्यांचा रंग तांबडा असा हा कोतवाल. स्वतःच्या रक्षणासाठी मोठ्या पक्ष्यांना तो पळवूनलावतो. नदीजवळून गाडी जाऊ लागली की, नदीत एखादा खंड्या बुडी मारताना दिसतो. छंद मासे मारण्याचा पणपोशाख मात्र सुरेख. चकचकीत निळा व तपकिरी रंगाचा पाणथळी राहणारा हा पक्षी आहे. खंड्याला 'धीवर' पक्षीअसेही म्हणतात. काही शेतांत मोर दिसतात. कधी सुंदर पिसारा उभारून नाच करताना तर कधी झाडाच्या फांदीवर ऐटीत बसलेले. मोराची पाहण्याची व ऐकण्याची क्षमता तीक्ष्ण आहे. मोराच्या मादीला लांडोर म्हणतात. मोर भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. निसर्गाचा हा खजिना आपण जतन करायलाच हवा.


0 Comments