बलसागर भारत होवो-इयत्ता सहावी मराठी

6193

बलसागर भारत होवो

साने गुरुजी-(१८९९-१९५०) साने गुरुजींनी कथा,कविता,कादंबऱ्या असे विपूल ललित लेखन,तसेचवैचारिक लेखन केलेले आहे.‘श्यामची आई’,‘धडपडणारी मुले’, ‘भारतीय संस्कृती’, ‘गोड गोष्टी’,‘सुंदर पत्रे’ इत्यादी त्यांची पुस्तके प्रसिद्धआहे. हे गीत‘स्फूर्तिगीते’ या पुस्तकातून घेतले आहे.

कविता परिचय

पराक्रम ऐक्य सेवा त्याग आणि देशभक्ती यांच्यामधून आपला भारत देश अधिक शक्तिशाली व्हावा अशी अपेक्षा साने गुरुजींनी या समूहगीत आता व्यक्त केली आहे.

बलसागर भारत होवो-इयत्ता सहावी मराठी

बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो ।।धृ।।
हे कंकण करि बांधि यले,
जनसेवे जीवन दिधले,
राष्ट्रार्थ प्राण हे उरले,
मी सिदध मरायाला हो । बलसागर…. ।।१।।
वैभवी देश चढवीन,
सर्वस्व त्यास अर्पीन,
हा तिमिर घोर संहारिन,
या बंधु सहाय्याला हो । बलसागर …. ।।२।।
हातात हात घेऊन,
हृदयास हृदय जोडून,
ऐक्याचा मंत्र जपून,
या कार्य करायाला हो । बलसागर …. ।।३।।
करि दिव्य पताका घेऊ,
प्रिय भारत गीते गाऊ,
विश्वात पराक्रम दावू,
ही माय निजपदा लाहो । बलसागर …. ।।४।।
या उठा करू हो शर्थ,
संपादु दिव्य पुरुषार्थ,
हे जीवन ना तरि व्यर्थ,
भाग्यसूर्य तळपत राहो । बलसागर …. ।।५।।
ही माय थोर होईल,
वैभवे दिव्य शोभेल,
जगतास शांति देईल,
तो सोन्याचा दिन येवो । बलसागर …. ।।६।।
जय जय महाराष्ट्र माझा- इयत्ता सातवी मराठी
कवितेचा अर्थ 
आपला भारत देश हा शक्तिशाली हवा व सर्व जगात त्याची ख्याती पसरावी यासाठी जनसेवेचे व्रत मी हाती घेतले आहे भारतासाठी माझे प्राण द्यायला देखील मी तयार आहे.
माझ्या देशाला वैभव मिळवून देण्यासाठी मी माझे सर्वस्व अर्पण करणार आहे त्यासाठी भेदभाव अराजक्ता अशांचा अंधार दूर करावा लागणार आहे त्यासाठी तुम्ही सर्व बांधव मला सहाय्य करायला या.
भारताच्या वैभवशाली वैभवा साठी आपण सगळे एकत्र येऊ ातात हात घेऊन मनात ऐक्‍याचा एकजुटीचा मंत्र म्हणत आपण हे कार्य करायला सिद्ध होऊ या.
हाती दिव्य पताका घेऊ आपण प्रिय भारत विषयीची गीते गाऊ या आपल्या भारताचा पराक्रम संपूर्ण जगात दाखवूया.
चला यासाठी आपण आपल्या पराक्रमाची शर्थ करू या त्यासाठी आपण शक्य ते सगळे प्रयत्न करूया असे जर केले नाही तर आपले जीवन वाया जाईल त्यामुळे भारताचे भाग्य असेच उजळुन निघो.
या सर्वांमुळे भारताचे नाव मोठे होईल त्याचे वैभव वाढेल जगाला शांती देणारा भारत हा महान देश होईल व हा सोन्याचा दिवस लवकरात लवकर उदयाला येवो. 
या कवितेवरील व्हिडीओ पहा